Site icon लोकाशा-बंब न्यूज

आता मनोज कोल्हे धारुरचे नवे बिईओ

 
बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : धारूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी मनोज कोल्हे यांची 26 एप्रिल रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. धारूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी आतापर्यंत शिक्षण विस्तार अधिकारी गणेश गिरी यांच्याकडे होती. गिरी यांनी अगदी चोख पध्दतीने ही जबाबदारी निभावलेली आहे. 26 एप्रिल रोजी उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर सरळसेवेने रूजू झालेल्या अधिकार्‍यांना नियमित पदस्थापना दिल्या आहेत. त्यानुसार मनोज कोल्हे यांच्याकडे धारूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते लवकरच आपल्या पदाचा पदभार स्विकारणार आहेत.

Exit mobile version