Site icon लोकाशा-बंब न्यूज

भाजप नेते शांतीनाथ डोरले यांना पितृशोक, मनोहर डोरले यांचे निधन

बीड, मौजे काळेगाव हवेली ता. बीड येथील भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि बीड विधानसभा मतदार संघाचे विस्तारक शांतीनाथ डोरले यांचे वडील मनोहर विक्रम डोरले यांचे काल रात्री साडेदहा वाजता दीर्घ आजाराने उपचारा दरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
अंत्यविधी मंगळवार आज दिनांक 23/04/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता भगवान बाबा प्रतिष्ठान स्मशानभूमी बीड येथे होणार आहे, डोरले कुटूबियांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.

Exit mobile version