Site icon लोकाशा-बंब न्यूज

खर्च निरीक्षकांनी घेतली जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट

बीड, दि.18 (जिमाका) भारतीय राजस्व सेवेतील सुशांताकुमार बिस्वास हे 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून काम पाहणार असून त्यांनी आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांची भेट घेतली.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर त्यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकारी कविता जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित होते.
यावेळी त्यांनी 39 बीड मतदार संघाची माहिती जाणून घेतली. तसेच निवडणुकी संदर्भात खर्च निरीक्षक म्हणून काम करताना कामाच्या स्वरूप कसे असणार आहे याबद्दल सांगितले.
शासकीय विश्रामगृह येथे असून त्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली असून श्री बिस्वास यांचा संपर्क क्रमांक 9404460511 हा आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान हे त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून सोबत असणार आहेत.

              
Exit mobile version