कोरोनात योगदान देणार्या छायाताईंच्या कुटूंबियांना लवकरच मिळणार 50 लाखाचे आर्थिक कवच
Lokasha Abhijeet
बीड : जिल्ह्यातील अनेक जण आपला जीव मुठीत धरून कोरोनाचा मोेठ्या ताकतीने सामना करत आहेत. कोरोनाशी दोन हात करतानाच येथील जिल्हा रूग्णालयात सेवा देत असताना आरोग्य कर्मचारी छायाताई बहिरे यांचा मृत्यू झाला होता, छायाताईंच्या कुटूंबियांना लवकरच 50 लाखाचे आर्थिक कवच मिळणार आहे. तसा मदतीचा प्रस्ताव गुरूवारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे. तो लवकरच मंजूर होणार असल्याचा विश्वास डॉ. थोरात यांनी व्यक्त केला आहे.