Site icon लोकाशा-बंब न्यूज

ऊस तोडणीला मजूर पाठवतो म्हणून मुकादमाला घातला आठ लाखाला गंडा


परळी वैजनाथ, दि. 3 (लोकाशा न्यूज) : ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील एका जणाने परळी तालुक्यातील ऊसतोड मुकदमाला तब्बल आठ लाख रुपयाला गंडा घातल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
          याबाबत ग्रामीण पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी बबन सुदाम कदम वय-49 वर्षे व्यवसाय-ऊस तोड मुकादम रा-नंदागौळ ता- परळी यांनी आरोपी विष्णु उकंडा राठोड वय-29 वर्ष रा-वनवारला ता-पुसद जि-यवतमाळ याच्याशी करार केला होता.आरोपीने फिर्यादी व साक्षीदाराकडून कास्खाण्याला ऊस तोडणीसाठी मजुर पुरवतो असे म्हणुन विश्वासाने 800000/रु (आठ लाख रु) घेतले.पैसे घेऊनही ऊस तोडणीसाठी मजुर पुरवले नाही व फिर्यादीचे पैसे वापसही दिले नाही. त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार यांचा त्याने विश्वासघात केला म्हणून पोलीस स्टेशन परळी ग्रामीण येथे आरोपीविरुद्ध गुरन. कलम-84/2024 कलम-406 भादवी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोह केकाण हे करीत आहेत.

Exit mobile version