Site icon लोकाशा-बंब न्यूज

अंबाजोगाईत उपप्राचार्य अन् प्राध्यापकात फ्रिस्टाईल, कडाक्याच्या भांडणात उपप्राचार्याचे फुटले डोके, संस्थेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दाबले



अंबाजोगाई, दि. 3 (लोकाशा न्यूज) : अंबाजोगाई शहर मराठवाड्याचे पुणे आहे, शिक्षणाचे माहेर घर आहे असे म्हटले जाते विविध शिक्षण संस्थेचे प्रतिष्ठित महाविद्यालये शहरांमध्ये आहेत,  अशाच एका प्रतिष्ठित महाविद्यालयाचे उपप्राचार्य व एका प्राध्यापकात महाविद्यालय परिसरातच कडाक्याचे भांडण झाले यात एकाचे डोके फुटून आठ टाके पडल्याचे समजते, प्रकरण पोलिसात गेले मात्र संस्थेची व प्राध्यापकाची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरणात समेट घडवून आणला जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राकडून समजते.
मुळात महाविद्यालय कोणतेही असो महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेतात मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी हजेरी लावत नसल्याने प्राध्यापकांना तास नसल्याने चहा पाणी करत वेळ घालवण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही असाच प्रकार अंबाजोगाईतील एका महाविद्यालयाच्या परिसरात चार ते पाच दिवसांपूर्वी घडला असल्याचे समजते, उपप्राचार्य व प्राध्यापकामध्ये नेमक्या कोणत्या विषयावरून एकमेकांचे डोके फोडेपर्यंत वाद झाला माहित नाही मात्र प्रकरण कितीही मिटवण्याचा प्रयत्न होत असला तरी ज्यांचे डोके फुटले ते समेट करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे समजते, महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थाचालक कितीही प्रयत्न करत असले तरी या भांडणाची चर्चा अंबाजोगाई शहरात चवीने चर्चिली जात असून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी ही घटना असल्याची चर्चा होत आहे.

Exit mobile version