Site icon लोकाशा-बंब न्यूज

धुळे एलसीबीच्या पीआयला दीड लाखाची लाच घेताना पकडले, एसीबीची मोठी कारवाई, पडलेला अधिकारी निघाला बीडचा

धुळे,
बीड येथील सम्राट चौक शाहुनगर भागातील रहिवाशी तथा स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे पो.नि.दत्तात्रय सखाराम शिंदे यांच्यासह अन्य तिघांना दीड लाख रूपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी केली.
तक्रारदार यांचेवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी आलोसे क्र 1 यांनी तक्रारदार यांच्याकडून 2,00,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शवून सदरची रक्कम नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. सदर लाच रक्कमे बाबत तक्रारदार यांनी नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी तडजोडीअंती 1,50,000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून पंचांसमक्ष वरील लाच रक्कम स्वीकारताना दत्तात्रय सखाराम शिंदे, पद- पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा, धुळे ( वर्ग- 1) , रा. सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड 2) नितीन आनंदराव मोहने, पद -पो हवा. 334, स्थानिक गुन्हे शाखा धुळे, ( वर्ग- 3), रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे.3) अशोक साहेबराव पाटील, वय 45 वर्ष, पद- पो. हवा 1629, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे. ( वर्ग- 3) रा .- प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने धुळे येथे केली.

सदरील सापळा रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या नेतृत्वात पो.हवा.राजन कदम, , पो.ना. संतोष पावरा, पो. शि.रामदास बारेला, चालक पो. शि. बडगुजर यांनी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक परीक्षेत्र, नाशिक,माधव रेड्डी अपर पोलिस अधिक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक,नरेंद्र पवार पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Exit mobile version