बीड, प्रतिनिधी :- भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या तथा बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी शनिवारी (दि.30) डॉ. संतोष शिंदे यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शिंदे कुटुंबातील प्रत्येक सदस्याची अस्थेवाईकपणे चौकशी केली. शिंदे कुटुंबाने देखील पंकजाताई यांचा कौटुंबीक जिव्हाळ्याने सन्मान केला. यावेळी पंकजाताई यांनी जपलेला कौटुंबीक जिव्हाळा अन् प्रेम पाहून सारे शिंदे कुटुंबीय भारावून गेले.
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना भाजपाने बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. या अनुषंगाने त्या पक्ष, राजकारण आणि जाती- धर्माच्या पलीकडे जावून कौटुंबीक ऋणानुबंध जपणार्या लोकांच्या अवर्जून भेटी घेत आहेत. शनिवारी (दि.30) बीड येथे कौटुंबीक रूणानुबंध असलेल्या अनेक ठिकाणी पंकजाताई यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. संतोष शिंदे यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलला पंकजाताई यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी नामदेवराव शिंदे, प्राचार्य शिवाजी शिंदे, डॉ. संतोष शिंदे, सुदर्शन शिंदे, स्वाती शिवाजी शिंदे, डॉ. उज्वला संतोष शिंदे, अश्विनी सुदर्शन शिंदे, आदीत्य व अभिषेक शिवाजी शिंदे, इशान व शार्दुल संतोष शिंदे, रूद्रप्रताप व गौरी सुदर्शन शिंदे तसेच लाईफलाईन हॉस्पिटलमधील डॉ. संजय राऊत, डॉ. प्रशांत निराळे, डॉ. उमेश घायतिडक, डॉ. सरोजा घायतिडक, डॉ. अबोली पैठणकर, डॉ. प्रीयंका भावले, डॉ. अमोल खंडागळे, डॉ. आमेर, डॉ. आचल आढाव, डॉ. रितेश हलदार, डॉ. सचिन चोले, डॉ. अमोल गिते, डॉ. सुरेश मुंडे, डॉ. अशोक सानप, डॉ. अर्जून जायभाये, डॉ. अरूण बडे यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी, नर्स उपस्थित होते. यावेळी डॉ. शिंदे परिवाराच्या वतीने पंकजाताई यांचा कौटुंबीक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. शिंदे कुटुंब व लाईफलाईन परिवाराच्या वतीने पंकजाताई यांचा कौटुंबीक जिव्हाळ्याने सत्कार करण्यात आला. शिंदे कुटुंबीयांनी केलेल्या सत्काराने पंकजाताई भारावून गेल्या होत्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, देविदास नागरगोजे व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लाईफलाईन हॉस्पिटलला पंकजाताईंची सदिच्छा भेट, डॉ. संतोष शिंदे व परिवाराकडून कौटुंबीक स्वागत
