Site icon लोकाशा-बंब न्यूज

महादेव जानकर परभणीमधून लोकसभा लढणार, जाणकारांच्या उमेदवारीची तटकरेंनी केली घोषणा


मुंबई,
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) लोकसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये परभणीमधून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महायुतीच जागा वाटप वेळोवेळी चर्चा सुरू आहे. भाजपने २४ उमेदवार घोषित केले. शिंदे गटाने ८ जागांवर उमेदवार घोषित केले. रायगड आणि शिरूर जागांवर अजित पवार यांनी घोषणा केली आहे. आम्ही ७-८ जागा मागितल्या आहेत.सकारात्मक चर्चा सुरू आहे.परभणीची जागा मागितली होती. अमित शहा यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत ही जागा आम्हाला देण्याचं ठरलं आहे. महायुतीच हित लक्षात घेता ही जागा महादेव जाणकारांना देण्याचे ठरले आहे, असे सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.

Exit mobile version