बीड, अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील
घोसापुरीत घडली आहे, होळीच्या पूर्व संध्येला घडलेल्या खुनाच्या या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे.
अश्विनी बन्सी माळी वय 17 असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे, या घटनेमध्ये पाच आरोपींचा समावेश असून अश्विनी ही आरोपीच्या मामाची मुलगी होती, या घटनेने नात्याला काळीमा फासली आहे, या प्रकरणात पाच जणांचा समावेश असून तीन जणांना बीड पोलिसांनी अटक केली आहे, आरोपींपैकी एकाने विष प्राशन केले असून त्याला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अत्याचार करून अल्पवयीन मुलीची हत्या, घोसापुरीत होळीच्या पूर्व संध्येला घडलेल्या खुनाच्या घटनेने जिल्हा हादरला
