Site icon लोकाशा-बंब न्यूज

पारस संचेती यांचे पुतणे प्रितेश संचेती यांचे अपघातात निधन, उद्या सकाळी अमरधाम स्मशानभुमित होणार अंत्यविधी


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : येथील पारस संचेती यांचे पुतणे व्यापारी प्रेमचंद बाबूलाल संचेती यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रीतेश संचेती यांचे अपघातात दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 37 वर्षे होते, ते पुणे येथे बारा-पंधरा योगा ग्रुपच्या मित्रांसोबत गेले होते, रविवारी दुपारी ते पुण्यावरून बीडकडे ब्रिझा (एम.एच. 23 एडी 4564) गाडीतून आपले दोन मित्र मुकेश अग्रवाल आणि मयूर लांडे यांच्यासह बीडला परतत होते, दुपारी साडे चारच्या सुमारास शिक्रापुरजवळ त्यांच्या गाडीचा झाडाला आदळून मोठा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये अग्रवाल आणि लांडे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ पुण्यातील संचेती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रीतेश संचेती यांच्या मृतदेहावर उद्या दि. 18 मार्च रोजी सकाळी दहा वाजता शहरातील अमरधाम स्मशानभुमित अंत्यविधी करण्यात येणार आहे. तत्पुर्वी विप्रनगर बामनवाडी बीड येथील त्यांच्या निजी निवासावरून त्यांच्या मृतदेहाची अंतयात्रा काढण्यात येणार आहे. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, एक भाऊ, एक बहिण, दोन मुले असा मोठा परिवार आहे. संचेती कुटूंबियांच्या दु:खात दै. लोकाशा परिवार आणि सकल जैन समाज सहभागी आहे.

Exit mobile version