बीड: देशात १८ व्या लोकसभेसाठी निवडणूकीच्या तारखा अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १८ व्या लोकसभेसाठी एकुण ७ टप्प्यात मतदान होणार आहे. याची सुरुवात याच महिन्यापासून होणार असून शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होईल. सर्व ठिकाणची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे ४ जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणारआहे. हे मतदान २६ एप्रिल, ७ मे , १३ मे , २० मे , २५ मे रोजी होईल. यापैकी 13 मे रोजी बीड लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले, देशात सात टप्प्यात होणार निवडणूक, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, 13 मे रोजी बीड लोकसभेसाठी मतदान,चार जूनला लागणार निकाल, आचारसंहिता लागू
