बीड,
छोट्या जातीच्या मुख्यापकाच्या हाताखाली काम करण्यास सह शिक्षकांना लाजू वाटू लागल्याने शेकटा येथील झेडपीच्या मुख्याध्यापकास दोन शिक्षकांनी कट रचून अंगावर गाडी घालत भर रस्त्यावर जबर मारहाण केली, ही घटना 12 मार्च रोजी पाडळशिंगी हायवेवर दुपारी चार वाजता घडली. या घटनेत जखमी झालेल्या मुख्याध्यापकावर जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक पाच मध्ये उपचार सुरू आहेत, याबाबत गेवराई पोलिसांनी बुधवारी रात्री सदर मुख्याध्यापकाचा जबाब नोंदविला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबादास मल्हारी नारायणकर असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे, नारायणकर गेवराईंच्या शेकटा येथील झेडपीच्या शाळेवर मुख्याध्यापक आहेत, त्यांच्यासह या शाळेत आठ शिक्षक कार्यरत आहेत, छोट्या जातीच्या मुख्याध्यापकाच्या हाताखाली काम कसे करावे, म्हणून मुख्याध्यापक अंबादास नारायणकर यांना सातत्याने सह शिक्षक रघुनाथ नागरगोजे आणि सुभाष संतोष गिरी हे दोघे त्रास देत होते, 12 मार्च रोजी तर या दोघांनी कळसच केला, गाडीमधून प्रवास करताना नागरगोजे आणि गिरी या दोघांनी कट रचून पाडळशिंगी परिसरात अंगावर गाडी घालून भर रस्त्यावर बेदम मारहाण केली, यावेळी सहशिक्षक राजेंद्र घोडके आणि लक्ष्मण परझने यांनी गिरीला रोखले त्यामुळे मुख्याध्यापक अंबादास नारायणकर यांचा जीव वाचला, त्यांच्या या मारहाणीची वेळेत ना शिक्षण विभागाने दाखल घेतली आहे ना पोलिसांनी, शिक्षकांच्या अश्या वागण्याने बीड झेडपीची इभ्रत वेशीला टांगली गेली आहे, जमखी मुख्याध्यापकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून बुधवारी रात्री उशिरा गेवराई पोलिसांनी सदर मुख्याध्यापकांचा जबाब नोंदविला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झेडपीच्या शिक्षकांनी इभ्रत वेशीला टांगली, छोट्या जातीच्या मुख्यापकाच्या हाताखाली काम करण्यास शिक्षकांना लाज वाटू लागली, म्हणून शेकटा येथील झेडपीच्या मुख्याध्यापकास दोन शिक्षकांनी कट रचून भर रस्त्यावर केली बेदम मारहाण, मारहाणीची दखल वेळेत ना शिक्षण विभागाने घेतली ना पोलिसांनी
