Site icon लोकाशा-बंब न्यूज

आदर्श कामावर सन्मानाची पडणार थाप, पद्मपाणीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर, तहसिलदार सुहास हजारे, आदर्श शिक्षक अशोक नखाते, पत्रकार मुकेश झनझने, प्रदिप तरकसेंना मिळणार राज्यस्तरीय पुरस्कार, 17 मार्चला बीडमध्ये होणार पुरस्काराचे वितरण


बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : आदर्श कामाची दखल घेवून दरवर्षी पद्मपाणीच्या वतीने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात, त्यानुसार याही वर्षाचे पद्मपाणीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या 17 मार्च रोजी दुपारी 12 ते 3 यावेळेत या पुरस्काराचे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वितरण केले जाणार आहे.
यावर्षीच्या पुरस्कारचे मानकरी बीड तहसिलदार सुहास हजारे, सारणी येथील जि.प. शाळेचे आदर्श सह शिक्षक अशोक नवनाथ नखाते, दै.लोकाशाचे उपसंपादक मुकेश झनझने, पत्रकार प्रदिप तरकसे हे ठरले आहेत, सुहास हजारे यांचे काम अत्यंत प्रभावी आहे, तसेच अशोक नखाते यांनीही आपल्या कामातून आवरगावाला आदर्श बनविण्याबरोबरच सारणी येथील शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना धडविण्याचे मोठे काम केलेले आहे, तसेच मुकेशन झनझने, प्रदिप तरकसे यांनीही आपल्या पत्रकारितेतून समाजातील अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे.
त्यांच्या याच आदर्श कामाचा येत्या 17 मार्च रोजी सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. लोकाशाचे संपादक विजयराज बंब हे असणार आहेत.
प्रति वर्षाप्रमाणे सन 2023-24 या वर्षातील सर्वोच्च पद्मपाणी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत केले आहे. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून दिलीप तरकसे यांनी या पुरस्काराचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. लोकाशाचे संपादक विजयराज बंब हे असणार आहेत. पद्मपाणी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये अशोक नवनाथ नखाते (जि. प. प्रा. शाळा , सारणी (आनंदगाव केंद्र पैठण ता. केज जि. बीड), महादेव सोनवा सरवदे (होळ), सुनिता श्रीमंतराव जायभाये (जि. प. प्रा. शाळा डेकणमोह, केंद्र जरूड ता. जि. बीड), प्रा. गोविंद (श्री. महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, सोनपेठ. जि.परभणी), अमोल भुजंगराव देवडे (न्यू.हायस्कूल हर्सूल ता.जी.संभाजी नगर (औरंगाबाद), संभाजी नरहरी मुसळे (शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुरडी ता. आष्टी जि. बीड), प्रो. संजय रावसाहेब सावते (कालीकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,ता. शिरूर कासार जि. बीड), कांबळे राजाभाऊ संभाजीराव (जोधा प्रसाद हायस्कूल ता.अंबाजोगाई जिल्हा बीड) तसेच पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारामध्ये दै.लोकाशाचे उपसंपादक मुकेश झनझने, गीतांजली रंगराव लव्हाळे /वानखेडे (ता. वडवणी जिल्हा बीड), प्रदीप सिताराम तरकसे (ता.अंबाजोगाई जि. बीड), प्रचंड नानासाहेब सोळंके सा.बीड नेता (ता.जि. बीड), शिवप्रसाद गोपाळराव शिरसाट (ता.केज जि. बीड), नंदू सोपानराव गायकवाड (दै. किसान बीड), पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक पुरस्कार संदीप किसनराव राठोड (लातूर), माधव शंकरराव शेंडगे परडी (ता.वडवणी जिल्हा बीड), प्रा. अशोक तुकाराम गायकवाड (आयसीटी जिल्हा समन्वयक बीड), रंजना भीमराव दाणे (जिल्हा रुग्णालय बीड), मीनाक्षी सिताराम डोमाळे-देवकते (ता. जि.बीड), आशा आश्रुबा माने (बीड), पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार प्रा भरत आत्माराम शिरसाट (एरंडोल ता.एरंडोल जि. जळगाव), पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार सुहास हजारे (बीड), पद्मपाणी राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जि. प. प्रा. शाळा देवडी फाटा (ता. वडवणी जि. बीड), महाराणी ताराबाई माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, (ता.वडवणी जि बीड), पद्मपाणी राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार बाबुराव पोटभरे (ता. माजलगांव जिल्हा बीड), पद्मपाणी राज्यस्तरीय उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार चौसाळा येथील औताडे यांना जाहीर झाला आहे. दरम्यान या बद्दल सर्वच पुरस्कारकर्त्यांचे बीड जिल्ह्यातून कौतूक केले जात आहे.

Exit mobile version