Site icon लोकाशा-बंब न्यूज

पत्नीकडून पतीची हत्या ; गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील घटना

गेवराई : लोकाशा न्युज
तालुक्यातील धोंडराईत पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या प्रकरणी गेवराई पोलिसांत गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरू होती सदरची घटना दि.६ मार्च रोजी उघडकीस आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनिल निवृत्ती चातूर ( वय 43 वर्ष ) राहणार धोंडराई तालूका गेवराई जिल्हा बीड हा ईसम मयत झाला असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली तसेच घटनास्थळावर पोलिस दाखल झाले तसेच आपल्या नवऱ्याने रात्री दोनच्या सुमारास गळफास घेतला असल्याची माहिती पत्नीने पोलिसांना दिली. परंतु पोलिसांना याबाबत संशय आला तसेच त्यांनी सदरील महीलेची एक तास चौकशी केली असता तीने आपले पतीसोबत पटत नाही वादातून गळा दाबून मारले असल्याची कबुली गेवराई पोलिसांना दिली तर आरोपी महीला शारदा सुनिल चातूर ( वय 35 वर्ष ) हीला ताब्यात घेतले असून तिच्यांविरूद्ध गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती सपोनि कोठकर यांनी दिली आहे.

Exit mobile version