Site icon लोकाशा-बंब न्यूज

पहिल्या टप्प्यातील चाचणीत भारत बायोटेकची कोवॅक्सिन सुरक्षित



मुंबई : कोरोनाची लस विकसित करणारी भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसीच्या पहिला टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाली आहे. कोवॅक्सिनच्या सुरुवातीच्या ट्रायलमधून माहिती मिळाली आहे की, ही लस सुरक्षित आहे. कोवॅक्सिनवर संशोधन करणार्‍या संशोधकांनी ही माहिती दिली.
भारताच्या 12 शहरांमधील 375 स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी केली जात आहे. प्रत्येक स्वयंसेवकाला कोवॅक्सिनचे दोन डोस देण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात नागपूर आणि बेळगावात या लसीची चाचणी सुरु आहे. कोरोना व्हायरसवर स्वदेशी लस तयार करण्याच्या प्रक्रियेत भारत वेगाने पावलं टाकत आहे. भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलाच्या लसीची सहा शहरांमध्ये मानवी चाचणी सुरु आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलोजी (एनआयव्ही) सोबत मिळून तयार करण्यात आली आहे. या लसीचं 12 शहरांमध्ये परीक्षण केलं जात असून ज्या रुग्णालयांमध्ये याची मानवी चाचणी सुरु आहे, त्यात नागपूरमधील गिल्लूरकर, बेळगावमधील जीवनरेखा, दिल्ली आणि पाटण्यातील एम्स आणि पीजीआय रोहतकचा समावेश आहे. पीजीआय रोहतकमध्ये कोवॅक्सिनवर संशोधन करणार्‍या सविता वर्मा म्हणाल्या की, कोवॅक्सिन आतापर्यंत सुरक्षित असल्याचं निदर्शनास आलं आहे. आमच्याकडे सुरु असलेल्या मानवी चाचणीत कोणत्याही स्वयंसेवकावर या लसीचा नकारात्मक परिणाम दिसलेला नाही.

Exit mobile version