Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हा परिषदेतील 500 विद्यार्थ्यांना मिळणार नवी दृष्टी, रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत चष्मे

बीड, दि.5: (जिमाका): राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत जिल्हा परिषदेतील 500 विद्यार्थ्यांना मिळणार नवी दृष्टी रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने मोफत चष्माच्या रूपाने मिळणार असल्याने जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी चॅरिटेबल ट्रस्टचे आभार माननु ज्या विद्यार्थ्यांना चष्मा लागेला आहे त्यांनी तो नियमीतपणे वापरण्याचे आवाहन यावेळी केले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत बीड जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली असून 500 विद्यार्थ्यांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे समोर आले.
त्यानुसार रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्याचे ठरले त्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी यांच्या उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे यांना 500 चष्म्याचे बॉक्स सुपूर्द करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे , तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.

दरवर्षी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य व नेत्र तपासणी केली जाते. या अंतर्गत यावर्षीही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यांतील तपासणी 40 शाळेंमधील 500 विद्यार्थ्यांच्या नावासह रत्ना निधी चारिटेबल ट्रस्टने चष्म्याचे पॅकेट तयार केले असून ते थेट त्याच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
जिल्हाधिकारी यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत झालेली तपासणी आणि रत्ना निधी चारिटेबल ट्रस्ट कडून त्यानंतर मिळालेले चष्मे विद्यार्थ्यांनी नियमितपणे वापरण्याचे आवाहन केले आणि रत्ना निधी चारिटेबल ट्रस्टचे आभारही मानले.

Exit mobile version