बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : महासंस्कृती महोत्सवानिमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्यासह विविध शासकीय विभागातील अधिकारी कर्मचार्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी यांनी नेतृत्व केलेल्या थ्रोबॉल (महिला) महसूल संघ अंबाजोगाईला प्रथम क्रमांक मिळालेले आहे.
क्रीडा स्पर्धेचे पुरस्कार आज छत्रपती संभाजी क्रीडांगण येथे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील, कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम व द्वितीय चमूला मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. क्रिकेटमध्ये (पुरुष) प्रथम क्रमांक जिल्हा परिषदेच्या क्रिकेट संघाला मिळाला, द्वितीय क्रमांक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कबड्डी (पुरुष) प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शिक्षक संघ, द्वितीय क्रमांक महसूल संघ, कबड्डी (महिला) प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शिक्षिका संघ, द्वितीय क्रमांक महसूल संघ, व्हॉलीबॉल (पुरुष) प्रथम क्रमांक महसूल संघ अंबाजोगाई, द्वितीय क्रमांक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शिक्षिका संघ बीड, खो-खो (पुरुष) प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शिक्षक संघ बीड, द्वितीय क्रमांक महसूल संघ बीड, खो खो (महिला) प्रथम क्रमांक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शिक्षक संघ बीड, रस्सीखेच (पुरुष) प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शिक्षक संघ बीड, द्वितीय क्रमांक स्वा. सावरकर महाविद्यालय बीड, रस्सीखेच (महिला) प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शिक्षिका संघ बीड, द्वितीय क्रमांक महसूल संघ बीड, जलतरण (पुरुष) 50 मी. फ्री स्टाइल प्रथम क्रमांक संतोष देशमुख, द्वितीय क्रमांक प्रविण मिसाळ तृतीय क्रमांक गणेश नवले, जलतरण (पुरुष) 50 मी. बॅक स्ट्रोक प्रथम क्रमांक जितेंद्र पोथरकर, द्वितीय क्रमांक बालाजी तोंडे, तृतीय क्रमांक आर्य रघुराज श्रीमंत, जलतरण (महिला) 25 मी. फ्री स्टाइल प्रथम क्रमांक रूपाली मस्के, द्वितीय क्रमांक सारिका तारसे, तृतीय क्रमांक सुनिता ढाकणे, जलतरण (महिला) 25 मी. बॅक स्ट्रोक प्रथम क्रमांक सारिका तारसे, द्वितीय क्रमांक रूपाली मस्के, तृतीय क्रमांक सुनिता ढाकणे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महासंस्कृती महोत्सव क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकार्यांनी केले सन्मानित, अंबाजोगाई महसूलच्या महिला संघाने थ्रोबॉलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, संघाचे नेतृत्व स्वत:जिल्हाधिकार्यांनी केले
