Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवणार, शिक्षणाधिकारी भगवान फुलारींनी पदभार स्विकारला


बीड, दि. 29 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नुकतीच  भगवान फुलारी यांची नियुक्ती झालेली आहे, त्यानुसार त्यांनी गुरूवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे, जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणार असल्याचा विश्‍वास यावेळी त्यांनी बोलून दाखविला आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आणि योजनेचे शिक्षणाधिकारी पद रिक्त होते, त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नुकतीच भगवान फुलारी यांची नियुक्ती झालेली आहे तर योजनेच्या शिक्षणाधिकारी पदी संजय पंचगल्ले यांची नियुक्ती झालेली आहे, गुरूवारी फुलारी यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला आहे. जिल्ह्यातील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले आहे. यावेळी धारूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे विस्तार अधिकारी शिवाजी अंडील, केंद्र प्रमुख रामहरी गांधले, केंद्र प्रमुख दत्तात्रय कोकणे, डाटा इंट्री ऑपरेटर महेश थिगळे, साधन व्यक्ती राहूल चाटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी धारूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. 

Exit mobile version