बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) :- वाटणीपत्रा आधारे तक्रारदार व त्यांचा भाऊ यांची 7/12 ला मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना पिंपळगावचे तलाठी दिलीप विष्णू कन्हेरकर, वय -34 वर्ष, व्यवसाय नोकरी, तलाठी, सज्जा पिंपळगाव घाट, ता.जि.बीड(वर्ग -3) व दिगंबर लक्ष्मण गात वय ६७ वर्ष व्यवसाय तलाठी पिंपळगाव यांचे खाजगी मदतनीस रा. पिंपळगाव घाट ता.जि. बीड(खाजगी ईसम) आज दि.28 रोजी एसीबीच्या जाळ्यात अडकले.
तक्रारदार यांनी त्यांचे वडिलांच्या नावे मौजे पिंपळगाव घाट येथील शेत गट क्र. 664,676,669,681, 683, 684, 685, 687 मधील शेतजमीन वाटणी पत्रा आधारे तक्रारदार यांचे व त्यांचे भाऊ गणेश नाईकवाडे यांचे नावे खाते फोड आधारे 100 रु.चे बॅांडवर वाटनीपत्र केले होते वाटणीपत्रा आधारे तक्रारदार व त्यांचा भाऊ यांची 7/12 ला मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी पिंपळगावचे तलाठी श्री कनेरकर यांची भेट घेतली असता त्यांनी सदर काम करुण देण्यासाठी 17000 रुपयाची लाच मागितली . तक्रारदार यांना तलाठी कनेरकर मागणी करत असलेली लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी ला.प्र.वि. बीड येथे तक्रार दिल्यावरुण आज रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक तलाठी श्री कनेरकर यांनी तक्रारदार यांना त्यांचे प्रलंबित काम करण्यासाठी 17000/- रू. लाचेची मागणी करून तडजोड अंती 15000/- रू. स्वीकारण्याचे मान्य करून लाच रक्कम 15000/- रू. खाजगी मदतनीस दिगंबर गात यांचे मार्फतीने स्विकारण्याचे मान्य केले त्यावरुन तलाठी श्री कनेरकर यांचे चौसाळा येथील सुलतानपुर रोड वरील खाजगी कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले असता खाजगी ईसम दिगंबर गात यांनी तलाठी यांचे सांगणेवरुन पंचासमक्ष 15000 रुपये लाच स्वीकारली असता खाजगी ईसम दिगंबर गात यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. तसेच लागलीच तलाठी कनेरकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे नेकनूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
15 हजारांची लाच घेतांना तलाठ्यासह खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात
