बीड, दि.21 (मुकेश झनझने) ः- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शासनाने नुकतीच उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांना बदलीने पदस्थापना दिली आहे. यामध्ये बीड जिल्ह्याला आणखी दोन उपजिल्हाधिकारी मिळाले असून माजलगांव उपविभागीय अधिकारी (एसडीओ) पदी कैलास भागवत देवरे यांची तर अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी पदी श्रीमती मनिषा दांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन आदेश दि.21 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्याला मिळाले आणखी दोन उपजिल्हाधिकारी; माजलगांव, अंबाजोगाई एसडीओपदी यांची नियुक्ती
