Site icon लोकाशा-बंब न्यूज

आयपीएस कमलेश मीना यांचा दणका, केज शहरात देशी बनावटीचा गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुस जवळ बाळगुन दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला पकडले, सात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

केज, दिनांक 20/02/2024 रोजी मा. सहायक पोलीस अधीक्षक केन श्री कमलेश मीना साहेब यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली आहे को, काही इसम हे हमरस्त्यावर लुटमार करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाई कडुन नेकनूर कडे एक पांढऱ्या रंगाची सुझुकी कंपनीची इंटींगा चारचाकी गाडी क्रमांक MH-46-CM-1934 मध्ये बसुन येत अशी बातमी मिळाल्याने त्यांनी त्यांचे कार्यालयातील पोना विकास चोपने, पोना अनिल मंदे, पोना दिलीप गित्ते, पोकी/अशपाक ईनामदार, पोह मुंबे तसेच पालीस स्टेशन केज येथील पोउपनि शिदे साहेब, पोको/शहादेव म्हेत्रे, पोकों/महादेव बहिरवाळ, पोको प्रकाश मुंडे यांना सोबत घेवुन केज शहरामध्ये केज ते अंबाजोगाई रोडवर, तांबवेश्वर मेडीलक समोर रोडवर सापळा लावुन अंबाजोगाई कडुन येणाऱ्या पांढऱ्या रंगाची ईटींगा गाडी क्रमांक MH-46-CM-1934 हिस आडवुन गाडीतील इसमांना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन केज येथे आणून सदर इसमांची व गाडीची झडती घेतली असता सदर इसमांच्या ताब्यात एक देशी बनावटीचा गावटी कट्टा, पाच जिवंत काडतुस, एक रिकामी मंग्झोन व गाडीमध्ये मध्यल्या शिटखाली एक लोखंडी रॉड, डिक्कीमध्ये एक लोखंडी रॉड, एक लोखंडी स्क्रू ड्राव्हर व एक लाकडी दांडका मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे (1) गणेश पांडुरंग भोसले, रा. यशवंतराव चव्हाण चौक, अंचाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड, (02) हरीष तोमर देबडीगा, रा, बजेगली ता. कारकला जि. उडपी राज्य कर्नाटक ह. मु. डोंबीवली, मुंबई जि. मुंबई, 03) नारायण मंगळा करण, रा. महेशा ता. कृष्णप्रसाद जि. पुरी राज्य ओडीसा ह.मु. सायन मुंबई, 04) श्रीनिवास आशाअली बारगम, रा. संत ज्ञानेश्वर नगर गर्व्हमेंट कॉलनीच्या बाजुला बांद्रा पूर्व मुंबई, 05) श्रावण शिवाजी गायकवाड, रा. बोरीवली मुंबई, 06) दिपक दशरथ चाटे ऊर्फ ताठे,रा. धर्मनाका कामगार नगर-2 मुंबई, (07) नामदेव परसु पोवार, रा. कामोठा नवी मुंबई ता. पनवेल जि. रायगड असे असुन सदर 07 आरोपी विरुध्द पोना/विकास चोपने यांचे फिर्यादी वरुन केज पोलीस स्टेशन येथे कलम 399 भादविसह कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश पांडुरंग भोसले यासह

इतर आरोपीवर सुध्दा अंबाजोगाई, मुंबई, ठाणे शहरामध्ये दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री, नंदकुमार ठाकुर साहेब, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती. चेतना तिडके मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग केज श्री. कमलेश मीना साहेब, पोलीस निरीक्षक श्री प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस कर्मचारी विकास चोपने, अनिल मंदे, दिलीप गित्ते, अशपाक ईनामदार, मुंबे, शहादेव म्हेत्रे, महादेव बहिरवाळ, प्रकाश मुंडे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री. कमलेश मीना साहेब व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version