Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमध्ये 24 फेब्रुवारीपासून महासंस्कृती महोत्सव, एकापेक्षा एक मनोरंजनात्मक अन् प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार, कृषि महोत्सव, उमेद मराठवाडा विभागीय सरस, नवतेजस्वनी महोत्सवही लक्ष वेधणार,महासंस्कृती महोत्सवात बीडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांचे आवाहन


बीड, दि.20 (लोकाशा न्यूज) : महासंस्कृती महोत्सवात बीडकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी मंगळवारी पत्राकार परीषेदेच्या माध्यमातुन केले. या महोत्सवात एकापेक्षा एक असे मनोरंजनात्मक अन् प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवाबरोबरच आयोजित केलेले कृषि महोत्सव, उमेद मराठवाडा विभागीय सरस, नवतेजस्वनी महोत्सवही सर्वांचे लक्ष वेधणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते व सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थित केले जाणार आहे. यावेळी जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे, रजणी पाटील, जिल्ह्यातील सर्व आमदार, आयुक्त मधुकर राजेअर्दड, आयजी विरेंद्र मिश्रा, उपायुक्त विकास सुरेश बेदमुथा यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती राहणार आहे, या महोसत्वासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, प्रभारी सीईओ संगिता देवी पाटील, एसपी नंदकुमार ठाकूर, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी बाबासाहेब जेजूरकर, सुभाष साळवे, एस.बी. चिंचोलकर हे मोठी मेहनत घेत आहेत. दरम्यान हा महोत्सव होत असलेले छ. संभाजी महाराज क्रीडांगणावर जावून त्यांनी याठिकाणाचे भुमिपुजन केले आहे. यावेळी कृषी अधिक्षक बाबासाहेब जेजूरकर, तहसिलदार सुहास हजारे यांची उपस्थिती होती.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्राकारांशी बोलतांना जिल्हाधिकार्‍यांनी माहिती दिली. जिल्हाधिकार्‍यांनी पुढे सांगीतले, दि.24 ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज क्रिंडागण (मल्टीपर्पज मैदान) येथे होणार आहे. याठिकाणी महासंस्कृती महोत्सवासोबतच कृषि महोत्सव, उमेद मराठवाडा विभागीय सरस, नवतेजस्वनी महोत्सव असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला असुन यात सर्वच वयोगटातील नागरीकांसाठी विविध कार्यक्रम आहेत. बीड जिल्हयातील जनतेने या कार्यक्रमात येऊन ही पर्वणी अनुभवावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी पत्रकार परीषदेच्या माध्यमातुन नागरीकांना केले. महासंस्कृती महोत्सवामध्ये विविध क्रीडा स्पर्धा क्रिडा स्पर्धा, महाराष्ट्राची हास्य जत्रा,काईट फेस्टीवल, क्रेझी डान्स, प्रभो शिवाजी राजा महानाटय, योगा, मल्लखांब व इतर खेळ, महाराष्ट्राची लोकधारा, देश भक्तीपर गीत गायन, पोलीस वेपन महोत्सव, स्थानिक लोक कलावंत यांचे कार्यक्रम, सर्प माहिती शिबीर, स्टँडअप कॉमेडी शो व कवी संमेलन, अधिकारी व कर्मचार्‍यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असे एकापेक्षा एक मनोरंजनात्मक तसेच प्रबोधनात्मक या अंतर्गत होणार आहेत. कृषि प्रदर्शन, परिसंवाद/चर्चासत्र, आधुनिक कृषी औजारे प्रदर्शन व विक्री, शेतकरी उत्पादक कंपनी व सेंद्रिय शेती गट उत्पादित धान्य, फळे, फुले, भाजीपाला, महोत्सव व विक्री, आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने तृणधान्य पिकांना प्रोत्साहन व खाद्यपदार्थ, शेतकरी मेळावा, खरेदीदार विकेता संमेलन, खाद्य महोत्सव, शेती निगडीत औजारे खरेदी-विक्री दालन, पाळीव पशुधन प्रदर्शन, लहान मुलांसाठी फनफेअर, कृषि उत्पादने भव्य प्रदर्शन व विक्री या ठिकाणी असणार आहे.

उमेद मराठवाडा विभागीय सरसमध्ये असणार महिला उद्योजक
छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय विक्री प्रदर्शन, मराठवाडयातील आठ जिल्हयातील ग्रामीण भागातील 100 हुन अधिक स्वयंसहाय्यता समुहातील महिलांचा लक्षणीय सहभाग, महिलांच्या कलात्मक, रचनात्मक, कौशल्यातुन साकार उत्पादित वस्तुंचे भव्य विक्री व प्रदर्शन, उन्हाळी वाळवणं, लोणचे, मसाले, धान्य-कडधान्य, हस्तकला व कलाकुसरीची उत्पादने, आयुर्वेदिक उत्पादने व चविष्ट खाद्यपदार्थाची खाद्य जत्रा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासह अजुन बरच काही या ठिकाणी दिसेल.

नवतेजस्विनी महोत्सवामध्ये खवय्यांसाठी विशेष
ग्रामीण भागातील स्व्यंसहाय्यता महिला बचत गट निर्मित वस्तु/पदार्थाचे विक्री व पदर्शन, धान्य महोत्सव, जिल्हास्तरीय सकस आहार रेसिपी/तिरंगा थाळी स्पर्धा, हस्तकला भव्य पदर्शन व विक्री, खाद्य महोत्सव या ठिकाणी असणार आहे खवय्यांसाठी हे विशेष ठरेल, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

Exit mobile version