बीड दि.16 (प्रतिनिधी):
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक हे 42 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाणार असल्याने सीईओ पदाचा कार्यभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका श्रीमती संगीतादेवी पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
संभाजीनगर विभागाचे विभागीय उपायुक्त यांनी शुक्रवारी एका आदेशान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांना प्रशिक्षणासाठी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले तर प्रकल्प संचालिका संगीता देवी पाटील यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यानुसार सांगितादेवी पाटील यांनी शुक्रवार दि.15 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला. श्रीमती संगीतादेवी पाटील या कार्यक्रम कार्य तत्पर अभ्यासू आणि मनमिळावू अधिकारी म्हणून सुपरिचितआहेत. यापूर्वी त्यांनी जिल्ह्यात प्रकल्प संचालिका म्हणून काम केलेले आहे. डीआरडीए आणि उमेद अंतर्गत घरकुलासह विविध उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांशी त्यांचा सौदाहार्यपूर्ण संपर्क असल्यामुळे विविध विकास कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
संगीतादेवी पाटील बीड जि.प.च्या प्रभारी सीईओ, सीईओ अविनाश पाठक 19 पासून मसुरीला प्रशिक्षणासाठी होणार रवाना
