बीड, दि.12 (मुकेश झनझने) ः- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शासनाने काल दि.12 फेबु्रवारी रोजी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांना बदल्याने पदस्थापना देण्यात आली आहे. यात बीडच्या उपविभागीय अधिकारी पदी कविता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उपजिल्हाधिकारी कविता जाधव यांनी बीडच्या लघू पाटबंधारे विभागाच्या उपजिल्हाधिकारी म्हणून काजकाज पाहिले आहे. गेल्या आठवड्यातच शासनाने लघू पाटबंधारे उपजिल्हाधिकारी या पदावर सतिश धुमाळ यांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे कविता जाधव नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या. अखेर आज दि.12 फेबु्रवारी रोजी शासनाने त्यांची बीडच्या उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती केली आहे. दरम्यान, मागील आठवड्यापासून त्यांच्याकडे बीडच्या उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार होता. आता त्यांची नियमित उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बीडच्या उपविभागीय अधिकारी पदी कविता जाधव यांची नियुक्ती
