बीड,
दिनांक 08/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, यांनी घरफोडी करणारी टोळी उघडकीस आणुन तीन आरोपी निष्पन्न केले होते त्यापैकी एक आरोपी नामे सचिन ईश्वर भोसले वय 25 वर्षे रा.बेलगाव ता.कर्जत जि.अहमदनगर ह.मु.नागझरी ता.गेवराई यास पो.स्टे.चकलंबा येथे पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात दिले आहे. सदर आरोपींनी एकुण दहा घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले असून आरोपींनी चोरी केलेला चोरीचा माल कोठे ठेवला याचा शोध घेण्यासाठी पो.स्टे.चकलंबा व स्थागुशा बीड यांनी संयुक्तरित्या शोध घेवून तपास करण्यात आला असून आरोपीने चोरलेली मालमत्ता काढून दिलेली असून एकुण दहा गुन्हयातील 96 ग्राम सोन्याचे विविध दागिने किंमती 5,10,000/- रु चा सोन्याचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक बीड, मा.श्री.सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक, बीड, यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा येथील पोनि श्री. पो.नि. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पोशि सचिन आंधळे, नारायण कोरडे, अश्विनकुमार सुरवसे, महिला पोह/सुशिला हजारे, चालक/ अशोक कदम व राठोड सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, बीड व पो.स्टे.चकलंबा पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे.
दहा घरफोड्या करणाऱ्या टोळीकडून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
