Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड विधानसभा मतदार संघात पंकजाताईंचे गाव चलो अभियान, आज पौंडूळ येथे करणार मुक्काम

( बीड प्रतिनिधी )

देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियानास सुरुवात झाली आहे. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृती दिनानिमित्त हे अभियान राबवले जात असून, 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंत हे अभियान चालू असणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी भारत सरकारच्या माध्यमातून दहा वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले आहे.

या सर्व योजनेंची माहिती सामान्य जनतेला कळावी यासाठी दि 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या दरम्यान गाव चलो अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या पंकजाताई मुंडे या आज सायंकाळी 07.00 बीड विधानसभा मतदार संघातील श्री. क्षेत्र नारायणगड पायथ्याशी असलेल्या मौजे पौंडूळ गावामध्ये येणार आहेत.

पंकजाताई मुंडे श्री. क्षेत्र नारायण गडाचे महंत ह. भ.प. शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन नगद नारायणाचे आशीर्वाद घेऊन, गावामध्ये येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सामान्य जनतेच्या विकासासाठी केलेल्या विविध योजनांची माहिती जनतेसमोर मांडणार आहेत.

पौंडूळ फाट्यावर दिवार लेखन अभियान अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी कमळ चिन्ह काढून, गावातील मंदिर परिसरामध्ये ग्रामस्थांशी संवाद साधणार असून, नंतर समान्य कुटुंबाच्या घरी भोजन करून, त्याच ठिकाणी मुक्काम देखील करणार आहेत. यामुळे परिसरामधील ग्रामस्थ व कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.

Exit mobile version