Site icon लोकाशा-बंब न्यूज

अठरा वर्षापासून कोर्टात हजर न होता गुंगारा देत आसलेला आरोपी LCB ने केला जेरबंद

पोलीस ठाणे दिंद्रुड गुरनं.14/2006 कलम-395 भादवी चा गुन्हा 11 आरोपितांनी मिळून केला.त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले व तपास करून चार शीट न्यायालयात सादर केले. त्यानंतर अठरा वर्ष लोटूनही त्यामधील आरोपी हे कोर्टात हजर होत नसल्याने माननीय न्यायालयाने त्यांना पकडवारंट जारी केले.आज रोजी आरोपी नामे-शहाद्या उर्फ शहादेव काँग्रेस चव्हाण रा.खांडवी शिवार तालुका गेवराई जिल्हा बीड हा गेवराई बाजारात फिरत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यास जेरबंद करून पोलीस ठाणे दिंद्रुड यांचेकडे हजर करण्यात आले असून आरोपीस कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सदरची कामगिरी श्री.संतोष साबळे पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली PSI राडकर,Asi तुळशीराम जगताप,पोलीस हवालदार प्रल्हाद चव्हाण,राहुल शिंदे ,चालक Asi जायभाये यांनी केली आहे.

Exit mobile version