धारूर, दि. 4 . माजी खासदार रामराव आवरगावकर यांचे बंधू आवरगावचे माजी पोलीस पाटील वसंतराव ज्ञानोबा जगताप आवरगावकर यांचे रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास दुःखद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 74 वर्ष होते, त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता, ते एक वचनी, धार्मिक वृतीचे होते, त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता आवरगाव येथील शेतात अंत्यविधी करण्यात येणार आहे, त्यांच्या पश्चात पत्नी, सुरेंद्र, अजित ही दोन मुले, लता, ललिता या दोन मुली, सूना, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे, ते लोकाशाचे पत्रकार अभिजीत नखाते यांचे काका होतं, जगताप कुटूबियांच्या दुःखात बंब आणि दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.
रामराव आवरगावकर यांचे बंधू वसंतराव जगताप यांचे निधन, अंत्यविधी दुपारी दोन वाजता
