Site icon लोकाशा-बंब न्यूज

धारूरमध्ये एक क्विंटल गांजा पकडला, आयपीएस कमलेश मीना, ठाणेदार देविदास वाघमोडे यांच्या नेतृत्वात मोठी कारवाई, तीन महिलांसह पाच जणांना केली अटक, सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त

किल्लेधारुर – धारुर पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेतले असून तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

सविस्तर माहिती अशी की, अंबाजोगाई -आडस रस्त्यावर आडस येथे बेकायदेशीररित्या व विनापरवाना गांज्याची विक्री करण्याच्या उद्देशाने एका वाहनातून गांजा वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्री साडेदहा ते पहाटे साडेतीनच्या सुमारास पोलीस पथकाने पाठलाग करून कारवाई केली. या कारवाईत एक क्विंटल सतरा किलो गांजासह स्कार्पिओ गाडी, दोन मोबाईल व तीन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिक्षक कमलेश मीना, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे, प्रशांत मस्के, जमीर शेख, विकास चोपने, अशफाक इनामदार, नाना निंगुळे, नितिन काळे, परमेश्वर वखरे, धम्मानंद गायसमुद्रे, मुकेश खरटमोल, मल्लिकार्जून माने, श्रीमती दिक्षा चक्के, तुकाराम चांदणे यांचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने केली.

Exit mobile version