Site icon लोकाशा-बंब न्यूज

महसूल संघटनेच्या अध्यक्षपदी महादेव चौरे तर सरचिटणीसपदी विकास कोरडे

बीड, दि.28 (लोकाशा न्युज) ः- महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष राहूल शेटे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष सुहास हजारे यांच्या उपस्थितीत काल दि.28 जानेवारी बीड तहसील कार्यालयात जिल्ह्यातील महसूल कर्मचार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा शाखेची नविन कार्यकारणी जाहिर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी महादेव चौरे तर सरचिटणीस पदी विकास कोरडे यांची निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी महादेव चौरे, सरचिटणीस पदी विकास कोरडे, कार्याध्यक्षपदी राहूल शेटे, संघटक प्रकाश गोपड, प्रसिध्दीप्रमुख गिरिष मोहेकर, सहसचिव कपील गोंडसे, विनोद बळवंत, सहसचिव महिला श्रीमती उज्वला राऊत, श्रीमती रूपाली मस्के, श्रीमती गोदावरी नागरगोजे, उपाध्यक्ष बीड उपविभाग भैरवनाथ मुंडे, उपाध्यक्ष माजलगांव उपविभाग नजीर कुरेशी, उपाध्यक्ष पाटोदा उपविभाग श्रीमती वैशाली पोले, उपाध्यक्ष अंबाजोगाई उपविभाग मन्मथ पटणे, उपाध्यक्ष परळी उपविभाग वसीम शेख, उपाध्यक्ष महिला श्रीमती गवळी, श्रीमती हेमलता परचाके, प्रवक्ता सुनिल आखाडे, सहकोषाध्यक्ष संजय बहिरवाळ आदींची निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version