Maratha Reservation । मराठा आरक्षणासंदर्भात नवी मुंबईत मोठ्या घडामोडी घडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या देखील मराठा आरक्षणासंदर्भात नवी मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळामध्ये काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती साम टीव्हीला देण्यात आली आहे.
वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघणार असल्याचे देखील बोलले जात आहे. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील वाशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलनाविषयी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचे याकडे लक्ष लागले आहे.
सरकारने दिलेला नवीन जीआर मनोज जरांगे पाटील हे जाहीर सभेत वाचून दाखवणार आहेत. सध्या राज्यभरातून अनेक मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे अशी देखील भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे.
