Site icon लोकाशा-बंब न्यूज

झेडपी अभियंता संघटनेच्या अध्यक्षपदी वाघ तर जिल्हा संघटकपदी एम. एल. सय्यद यांची निवड


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : गुरूवारी बीड जिल्हा परिषदेमधील अभियंता संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार या संघटनेच्या अध्यक्षपदी भागवत वाघ, सचिव पदी प्रवीण मिसाळ, कार्याध्यक्षपदी एन. व्ही. मिसाळ तर जिल्हा संघटक पदी सय्यद एम. एल. यांची निवड करण्यात आली आहे. तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी के. व्ही. कुलकर्णी, प्रफुल्ल कुमार राजकुमार राव, अरविंद दुकाले, बाबासाहेब सानप यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी आर.बी काळे तर सहसचिव पदी पायल उरणे आणि तावरे व्ही. एम. यांची निवड करण्यात आली आहे. तसेच तालुकाध्यक्षपदी बीड तालुका पवन पोफळे, केज तालुका राजू हातागळे अंबाजोगाई अमर गाडे, माजलगाव तालुका तुषार भोसले, गेवराई तालुका योगेश पाखरे, वडवणी तालुका राहुल राठोड, आष्टी तालुका सुनील राठोड, पाटोदा तालुका भागवत सोनवणे, शिरूर तालुका येवले अण्णासाहेब, परळी तालुका शुभम बोतावार, धारूर तालुका ऋतुराज लांब यांची निवड करण्यात आली आहे. सदरील बैठकीचे आयोजन गुरूवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते, या निवडीकरिता संघटनेचे माजी अध्यक्ष आणि सेवानिवृत्त उप अभियंता जालिंदर भोरे, प्रभाकर नागरगोजे तसेच कार्यकारी अभियंता खेडकर तसेच श्री संजय पवार उपअभियंता, नाळवंडीकर,सुभाष चाटे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. भदेवाड यांनी केले. सदरील बैठकी करिता मार्गदर्शन श्री जालिंदर मोरे आणि एनगांवार यांनी केले. या बैठकीत सदर पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सदरील कार्यकारणी निवड करण्याकरिता जिल्ह्यातील व सर्व पंचायत समितीचे अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे आवर्जून उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी अध्यक्ष भागवत वाघ यांचे भाषण झाले सदरील भाषणांमध्ये त्यांनी संघटनेचे काम वाढविणे तसेच अभियंता यांच्या अडीअडचणी सोडून यावर भर दिला. संघटनेच्या वतीने सदरील बैठकीचा समारोप प्रवीण मिसाळ नवनियुक्त सचिव यांनी केला.

Exit mobile version