Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा. प्रीतमताई रमल्या नमो चषक स्पर्धेत, युवकांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठीच नमो चषक स्पर्धा – खा. प्रितमताई मुंडे, अनेक गुणवंत खेळाडूमुळे बीडची मान उंचावली  – राजेंद्र, मस्के, बीडमध्ये नमो चषक भव्य क्रीडा स्पर्धांचा थाटात झाला शुभारंभ


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज)  : युवकांमध्ये परस्पर सहकार्य भावना नेतृव क्षमता आणि स्पर्धात्मक प्रेरणा निर्माण करणे महत्वाचे आहे. खेळामुळे कौशल्य आत्मसाथ करून व्यक्तिमत्व घडवता येते. प्रत्येक युवक सक्षम आणि बलवान होण्यासाठी खेळाची प्रेरणा कायम टिकली पाहिजे. मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी नमो चषक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे, असे विचार खा. डॉ प्रितमताई मुंडे यांनी बीड विधानसभा मतदार संघातातील नमो चषक क्रीडा स्पर्धा शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.  दरम्यान सध्या सुरू असलेल्या नमो चषक स्पर्धेत बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई चांगल्याच रमल्याचे पहायाला मिळत आहे.
खेळ शारीरिक व मानसिक कला असून, खेळाच्या छंदामुळे निरोगी जीवनशैली प्राप्त करता येते. खेळामुळे आत्मविश्वास, जिद्द वृद्धींगत होते. तर वैयक्तिक व सांघिक यशासाठी प्रेरणा मिळते. बीड व परिसरातून अनेक गुणवंत खेळाडू निर्माण झाले. त्यांचे व्यक्तिमत्व घडले. स्पर्धा व धक्काधक्कीच्या युगात प्रत्येकाने खेळाचा छंद जोपासला पाहिजे. असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.  वैभव गर्जे, नागवे ज्ञानेश्वर, जय गाडीवान, अंकुश मेत्रे, किशोर कानडे, बाबासाहेब शिंदे, अंकुश कदम, महारुद्र गर्जे,सचिन सातपुते, लहू मेत्रे,निखील गर्जे,सुनिता नागरगोजे, अशा अनेक  नामांकित खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्यस्तरावर क्रीडा क्षेत्रात बीडची मान उंचावली आहे. याचा मला अभिमान आहे.  बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित बीड विधानसभा नमो चषक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडीयम बीड येथे बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या शुभहस्ते व भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, संपादक श्री. संतोषजी मानूरकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य – सर्जेराव तांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  क्रिकेट, कब्बडी, खो खो या तीनही मैदानी खेळाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. प्रथम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार वंदन करून व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार दिनेश लिंबेकर, चंद्रकांत नवले, क्रीडा अधिकारी चव्हाण सर, भाजपा पदाधिकारी नवनाथ शिराळे, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहागीर, विक्रांत हजारी, चंद्रकांत फड, भारत बाप्पा काळे, संगीताताई धसे, अजय सवाई, डॉ. लक्ष्मण जाधव, बालाजी पवार, शांतीनाथ डोरले, इरशाद भाई, सोमनाथ माने, विलास बामणे, गणेश पुजारी,संतोष राख,सुनील मिसाळ, दीपक थोरात, छायाताई मिसाळ, प्रीतताई कुकडेजा, शीतलताई  राजपूत, अनिल चांदणे, अमोल वडतिले, कपिल सौदा, राजू शहाणे, मधुकर गर्जे, मुरलीधर ढाकणे, अप्पासाहेब झोडगे, भूषण पवार, अम्मू जागीरदार, सुरेश माने, हरीश खाडे, अनिल शेळके तसेच नामांकित खेळाडू, अभिजित तांदळे, संजय धस, प्रताप तुपे, जोगदंड गौरव, रवींद्र नैराळे, व्यंकटेश हूरकुडे, शेख अजर, प्रा. गोपाल धांडे, राहुल जाधव, अमोल तांदळे, प्रमोद गर्जे, नामांकित  कॉमेंट्रीयन नासेर बागवान, स्कोरर बाबा सरफराज, राम प्रधान सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह खेळाडू क्रीडारसिक बहुसंखेने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन मारुतीराव तीपाले यांनी केले.

Exit mobile version