बीड, दि.16 (लोकाशा न्यूज) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद परिक्षेत्रातील विविध संवर्गातील पोलीस अधिकार्यांच्या बदल्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केल्या आहेत. पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील अधिकार्यांचा यात समावेश आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातून 13 पोलीस निरीक्षक, 42 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 22 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान या 77 अधिकार्यांवर लोकसभेच्या तोंडावर नवी जबाबदारी येणार आहे.
पोलीस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये बीड जिल्ह्यातील पाच अधिकारी बदलण्यात आले आहेत. यात बाळासाहेब पवार (धाराशिव), विश्वास पाटील (छत्रपती संभाजीनगर), रवी सानप (धाराशिव), धनंजय फराटे (छत्रपती संभाजीनगर), सलिम चाऊस (छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे तर प्रशांत महाजन, मारोती खेडकर, उसमान चांदशेख, संजय लोहकरे, प्रविण बांगर यांना बीड जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांमध्ये बीड जिल्ह्यातील 13 एपीआय बदलण्यात आले आहेत. यात केदार पालवे, विजय देशमुख, निलेश इधाटे, योगेश उबाळे, भाऊसाहेब गोसावी, अशोक खरात, संदीप दहिफळे, योगेश खटकळ, विलास हजारे, रामचंद्र पवार, कैलास भारती, अमोल गुरले, शंकर वाघमोडे यांचा समावेश आहे तर 13 नवे सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बीड जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये प्रतापसिंग बहुरे, नित्यानंद उबाळे, सोमनाथ नरके, देविदास सोनवळे, दिपक लके, सुरेश बनसोडे, मच्छींद्रनाथ शेंडगे, रघुनाथ जगताप, विजय नरवाडे, अनमोल केदार, प्रल्हाद मुंडे, देविदास वाघमोडे आणि बाबा राठोड यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील 10 पोलीस उपनिरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली असून तितकेच पोलीस उपनिरीक्षक बीड जिल्ह्यात आले आहेत. बदली करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांमध्ये गणपत जागडे, मनिषा गिरी, रवि देशमाने, औदुंबर मस्के, अजित चाटे, रामदास काळे, किरण पवार, संतोष नागरगोजे, संतोष गित्ते, प्रताप गर्जे, वासुदेव पवार यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात रविकुमार पवार, देवानंद साबळे, बजरंग कुठबरे, प्रल्हाद मदन, सतिष दिडे, उध्दव चव्हाण, युवराज टाकसाळ, विलास गुसिगे, विजय आहेर, राजू राठोड आणि नितीन काकरवाल या पीएसआयची नियुक्ती करण्यात आली आहे.