बीड, दि. 14( जि मा का) : पीएम किसान सॅचुरेशन योजना ही केंद्र सरकारकडून प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्पेशल असा फार्मर आयडी मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक कर्जासह अनेक शासकीय योजना व अनुदानाचा लाभ थेट मिळण्यास मदत होणार आहे. त्याकरिता प्रत्यक्ष शेतकऱ्याचे शेत जमिनीचे गट व्हेरिफिकेशन व आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाईल ओटीपीद्वारे ईकेवायसी होणे आवश्यक आहे. याकरिता ईकेवायसी करण्याचे काम चालू आहे. 81 टक्क्यांच्या पुढे हे काम झालेले आहे, त्यामुळे सर्वच तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी 100 टक्के ई केवायसी दिनांक 17 जानेवारीपर्यंत 100 % पूर्ण करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.