बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : अवघ्या 10 व्या वर्षी स्वत:ची कंपनी काढून मनोरंजनाचे वेगवेगळे गेम्स काढून जगभरात पोहोचविणार्या बीड येथील आर्यन सुरेश कुटे याच्या कार्याची दखल घेवून नवभारत के शिल्पकार पुरस्काराने त्याला शनिवारी मुंबई येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथे आयोजित केलेल्या एका शानदार सोहळ्यास राज्यपाल रमेश बैस, खा. पुनम महाजन, समुहाचे एम.डी. निमेष माहेश्वरी, ए. श्रीनिवास आदींची उपस्थिती होती. यावेळी मास्टर आर्यन सुरेश कुटे यांच्या कार्याची दखल घेवून नवभारत के शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कुटे ग्रुपच्या एम.डी. अर्चना सुरेश कुटे यांची उपस्थिती होत्या. आर्यन कुटे याने लहान वयात व्यवसायात आपले क्षेत्र निवडून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या पुरस्काराबद्दल आर्यन कुटेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. हा कार्यक्रम मुंबई येथील प्रसिद्ध होटेल ढरक्ष तर्ळींरपींर, र्उीषषश झरीरवश उेश्ररलर येथे सपंन्न झाला.