Site icon लोकाशा-बंब न्यूज

धारूरचे भूमिअभिलेख कार्यालय सोडले वाऱ्यावर, कार्यालयाचा नायब तहसिलदारानी केला पंचनामा, दुपारी बारा वाजेपर्यत फक्त एक शिपाई हजर, अधिकाऱ्यासह ११ कर्मचारी गैरहजर


धारूर,
भूमी अभिलेख कार्यालय मध्ये शेतकऱ्यांची विविध कामे असतात .गुरुवारी काही कामानिमित्त शेतकरी या कार्यालयामध्ये गेले होते .परंतु या कार्यालयामध्ये सकाळी साडेअकरा वाजले तरीही एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता .शेतकऱ्यांनी याची माहिती तहसीलदार यांना दिल्यानंतर तहसीलदार यांच्याकडून पंचनामा करण्यात आला .यावेळी फक्त एक शिपाई कार्यालयात हजर होता .पंचनामा सुरू असताना एक महिला अभिलेखापाल उपस्थित झाल्या .इतर अकरा कर्मचारी मात्र नियमबाह्य गैरहजर आढळून आले . धारूर शहराच्या पश्चिमेस भूमी अभिलेख कार्यालय आहे .शहराबाहेर कार्यालय असल्यामुळे याकडे तहसील कार्यालयाचे मात्र पाहिजे तसे लक्ष नसते .येथे ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकऱ्यांची नेहमी कामे असतात .मात्र या कार्यात कर्मचारी अधिकारी अनधिकृत पणे गैरहजर राहत असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबतात .
गुरुवारी सकाळी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात येथील शेतकरी गणेश जाधव, पंजाब जगताप, प्रसाद शिनगारे यांच्यासह अनेक शेतकरी दहा वाजण्याच्या सुमारास तिची नक्कल काढण्यासाठी हजर झाले होते . या वेळी कार्यालयामध्ये केवळ शिपाई हनुमंत जाधव हे उपस्थित होते .त्यांच्याकडे शेतीच्या नकलेची मागणी केली असता मला देता येत नाही . लेखापाल श्रीमती . गिते ह्या येत आहेत . तुम्हाला वाट पहावी लागेल असे उत्तर दिल्यानंतर शेतकऱ्यांनी बराच वेळ वाट पाहिली . बराच वेळ होऊनही कर्मचारी व अधिकारी येत नसल्याचे समजल्यानंतर ही बाब काही पत्रकारांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पत्रकार यांनी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे माहीती देण्यात आली . याची दखल घेवून त्यांनी नायब तहसीलदार प्रकाश गोपड यांना उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा पंचनामा करण्याचे सांगितले . यावरून श्री . गोपड, अव्वल कारकून श्री . बी . ए . फरके , महसूल कर्मचारी प्रदीप बनसोडे ,कोतवाल श्री . तीबोले यांनी साडे आकरा वाजण्याच्या दरम्यान कार्यालयात जावून पंचनामा केला . या वेळी कार्यालयात रिकाम्या खुर्च्या आढळून आल्या . कार्यालयात केवळ एक शिपाई आढळून आला . त्यांनी यावेळी हजरीपटाची तपासणी केली . हजरी पटानुसार मुख्यालयीन सहाय्यक पी.जी कळसकर , मोजणीदार व्हि. व्हि.खडके, एम. यु साखरे , भुमापक एन .नीटुरे, कर्मचारी डी.आर राऊत, श्रीमती . एम. व्ही .आयचित गैरहजर होते . पंचनामा सुरु असतांना अभिलेखापाल श्रीमती . डी .जे . गीते हजर झाल्या . एकून ११ कर्मचारी गैरहजर होते . कार्यालयिन कर्मचारी कार्यालयात गैरहजर असल्याने नागरिकांची कामे होत नसल्याने पंचनामे वरील नागरिकांनी तक्रार केल्याने , गैरहजर असल्याबाबत रजा किंवा वरिष्ठ कार्यालयाचे मीटिंग संदर्भात कोणतेही कागदपत्र पंचनामा वेळी दिसून आले नाहीत . त्यामुळे गैरहजर कर्मचारी कोणाच्या परवानगीने गैरहजर आहे याचा खुलासा तहसील कार्यालयाकडून संबंधित कर्मचाऱ्याकडून मागवण्यात आला आहे . मोठ्या संख्येने कर्मचारी गैरहजर असल्याने भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे . गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर आता वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version