Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडच्या कामाचा दिल्लीत डंका !



बीड : एक महिला अधिकारी समाजासाठी किती महत्वाचे स्थान बजावू शकते, हे बीड जिल्ह्यात डीवायएसपी पदावर कर्तव्य बजावताना ज्योती क्षीरसागर यांनी खर्‍या अर्थाने दाखवून दिले होते, त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये मोठा दबदबा निर्माण केला होता. आष्टीतील एका खूनाच्या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून या प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेपेपर्यंत पोहचिणार्‍याच याच कर्तव्यदक्ष ज्योती क्षीरसागर यांना केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलिस पदक मिळाले आहे. यामुळे बीड जिल्हा पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे. क्षीरसागर ह्या पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. सध्या त्यांच्याकडे पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची (सांगली) येथील प्राचार्य पदावर त्या कर्तव्य बजावत आहेत. आष्टी आणि गेवराई या दोन उपविभागात त्यांनी चांगल्या पध्दतीने कर्तव्य बजावले होते, गेवराई येथील एका हत्येच्या प्रकरणाने तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती, याही प्रकरणाचा छडा लावून ज्योती क्षीरसागर यांनी गुन्हेगारांना गजाआड केले होते, हे प्रकरण अनेक प्रतिष्ठित लोकांच्या बाजूने घुमत होते.

12 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट तपासासाठी देण्यासाठी देण्यात येणारे पदक Award of excellance in Investigation हे देशातील 121 पोलिस अधिकार्‍यांना प्रदान केले आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील तात्कालीन कार्यरत असलेल्या श्रीमती ज्योती क्षीरसागर पोलिस उपाधिक्षक आष्टी यांना प्रदान करण्यात आले आहे. Award of excellance in Investigation हे पदक प्रत्येक वर्षी तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांना देण्यात येत आहे. यामध्ये तपासातील योग्यता, प्राविण्य, गुणवत्ता व दोषसिध्दी इ.घटकांना विचारात घेवून या पदकासाठी नामांकन केले जाते. श्रीमती ज्याती क्षीरसागर सन 2011 या साली पोलिस उपविभाग आष्टी येेथे कार्यरत असताना पोलिस ठाणे आष्टी गु.र.नं.149/ 2011 कलम 302, 147, 148, 109, 201, 212. 307, 120 ब भादंवि या गुन्ह्याचा त्यांनी तपास केला होता. नमूद गुन्ह्यात राजकिय वादातून 11 ऑक्टोबर 2011 रोजी खाकाळवाडी येथील यात्रेत बाळू खाकाळ यांच्यावर तलवारीने 29 वार करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यांचा निकाल 19 मार्च 2019 रोजी जिल्हा सत्र न्यायालय यांनी सुनावला त्यामध्ये गुन्ह्यातील 05 आरोपीतांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सन 2020 च्या Award of excellance in Investigation च्या नामांकनासाठी बीड जिल्ह्यातील 150 महत्वाचे व उत्कृष्ट तपासांची स्वत: छाननी करून त्यापैकी दोन उत्कृष्ट तपासाचे प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठविले होते. त्यापैकी वर नमूद एका प्रस्तावाला नामांकन मिळाले असून श्रीमती ज्योती क्षीरसागर यांनी प्रदान करण्यात आले आहे. सध्या पोलिस अधीक्षक श्रीमती ज्योती क्षीरसागर, ह्या सांगली येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्यांना हे पदक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version