Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांची फलश्रुती ; ग्रामीण भागात होणार दर्जेदार रस्ते, जिल्ह्याची एकजूट आणि सर्वांच्या सहकार्यामुळे सर्वसमावेशक विकासाला गती मिळणार, खा. प्रितमताई मुंडे, पाटोदा तालुक्यात केले बारा कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन

पाटोदा. दि । ०८ ।
मागील दहा वर्षांच्या काळात बीड जिल्ह्याने अनेक संकटांचा सामना केला आहे. सततचा दुष्काळ,नापिकी,अतिवृष्टी या नैसर्गिक संकटांचा आणि कोरोना सारख्या महामारीचा धीरोदात्तपणे मुकाबला करत जिल्ह्याने आपल्यातील एकजूट कायम ठेवली. आपल्या या एकजुटीमुळे आणि सहकार्याने जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळणार आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसमावेशक, सर्वव्यापी विकास कार्यात सातत्य ठेवणार आहे’ अशी ग्वाही खा. प्रितमताई मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील कूसळंब येथे बोलताना दिली.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाटोदा तालुक्यातील कूसळंब येथे रस्ते विकास कामांचे भूमिपूजन केल्यानंतर खा. प्रितमताई मुंडे ग्रामस्थांशी संवाद साधत होत्या. याप्रसंगी विधानपरिषद सदस्य आ.सुरेश धस,सर्जेराव तांदळे,अजय धोंडे, माऊली जरांगे,सुवर्णा लांबरुड,सुधीर घुमरे,पांडुरंग नागरगोजे, मधुकर गर्जे,जयदत्त धस हे उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांमुळे दळणवळण व्यवस्था अतिशय दर्जेदार आणि सुलभ झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना देखील सुलभ दळणवळण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे माझे प्रयत्न आहेत. माझ्या दहा वर्षांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याची लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाची कामे आम्ही करत आहोत. या सर्व प्रक्रियेत आपण सर्व एकसंघ राहून आमच्या पाठीशी उभे आहात, आपल्या एकजुटीच्या बळावर जिल्ह्याच्या विकासाची एकएक पायरी आपण सर करत आहोत, पुढील काळातही सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्धतेने कार्यरत राहणार असल्याचे खा. प्रितमताई मुंडे म्हणाल्या.

जय भवानी…जय शिवाजी” गगनभेदी घोषणांनी खा. प्रितमताईंचे जोरदार स्वागत

बीड जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून एकूण एकहात्तर कोटींचे एकोणविस रस्ते मंजूर करून आणल्याबद्दल पाटोदा तालुक्यात ठिकठिकाणी खा. प्रितमताई मुंडे यांचे ग्रामस्थांनी स्वागत करून आभार मानले, प्रितमताईंच्या प्रयत्नांची ही फलश्रुती असून गावाला जोडणारे रस्ते दर्जेदार होतील अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान कूसळंब येथील ग्रामस्थांनी मात्र इतरांपेक्षा आगळेवेगळे स्वागत करून प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले. कूसळंबच्या मुख्य चौकात असंख्य ग्रामस्थांनी एकत्र येऊन फटाक्यांच्या प्रचंड आतिषबाजीत प्रितमताईंचे स्वागत केले. जय भवानी… जय शिवाजी… मुंडे साहेब अमर रहे’ या गगनभेदी घोषणांनी कूसळंबकरांनी केलेलं स्वागत उर्जादायी आणि बळ वाढवणार असल्याची भावना यावेळी खा. प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.

••••

Exit mobile version