Site icon लोकाशा-बंब न्यूज

मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा २३ तारखेला बीडमध्ये होणार, सभेच्या तयारीसाठी उद्या सुर्या लॉन्सला बैठक

बीड, दि. १४ (प्रतिनिधी) : मराठा समाजाला सरसकट कुणबी ्रपमाणपत्र व आरक्षण द्यावे, या आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा पुढच्या शनिवारी (दि. २३) बीड येथे निश्‍चित झाली आहे. सभेच्या तयारीसाठी उद्या शुक्रवारी (दि. १५) सुर्या लॉन्सवर बैठक होणार असून बैठकीला उपस्थितीचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व समाज बांधवांनी केले.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दुसऱ्या टप्प्यात उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दोन महिन्यांची मुदत मागीतली हाेती. श्री. जरांगे पाटील यांनी येत्या ता. २४ पर्यंत सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा अन्यथा पुढील दिशा स्पष्ट करु, असा इशारा दिलेला आहे. दरम्यान, या कालावधीत श्री. जरांगे पाटील यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात देखील अंबासाखर, बोरीसावरगाव, धारुर व हरकी लिमगावला सभा झाल्या. आता ता. २३ रोजी बीडला इशारा सभा निश्‍चित झाली आहे. गुरुवारी (दि. १४) समाजबांधव व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी छत्रपती संभाजी नगरला उपचार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर बीडला सभा निश्‍चित झाली. बीड – अहमदनगर रोडवरील काकडहिरा भागातील श्री क्षेत्र नारायणगड विद्यार्थी वसतीगृहाच्या बाजूच्या मैदानावर दुपारी ही सभा होणार आहे. सभेच्या तयारीसाठी शुक्रवारी (ता. १५) दुपारी सुर्या लॉन्सवर समाज बांधवांची बैठक होणार आहे. बैठकीला उपस्थितीचे आवाहन करण्यात आले.

Exit mobile version