( बीड प्रतिनिधी )
देशात 2014 मध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांच्या दुरदृष्टी व विकसनशील नेतृत्वाखाली जन सामान्यांसाठी जवळपास २७५ विविध योजना मंजूर करून राबवल्या जात आहेत.समाज घटकातील प्रत्येक घटकांना आधार देण्यासाठी योजना पुढे आणल्या.
योजनांची माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचावी. लाभापासून कोणीही वंचित राहिला नाही पाहिजे. या हेतूने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांच्या प्रेरणेने देशभर केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसीत भारत संकल्प यात्रा सुरु आहे. संकल्प यात्रेचा रथ जिल्ह्यातील अनेक गावामध्ये येऊन या योजनांची माहिती देणार आहे. विकसित भारत ही मोदिजींची संकल्पना आहे. यात्रेच्या माध्यमातून
पंतप्रधान मोदीच्या जन समृध्दी योजना विकास गावोगावी पोहचवा,
असे आवाहन बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मुंडे यांनी बीड तालुक्यातील देवी बाबुळगाव येथे पंतप्रधान मोदी संकल्पित भारत यात्रा दरम्यान केले आहे.
आज बीड विधानसभा मतदारसंघातील मौजे देविबाभुळगाव येथे पोहचलेल्या विकास यात्रेत बीड लोकसभा मतदारसंघाच्या खा डॉ प्रतिमताई गोपीनाथराव मुंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्रजी मस्के यांनी देविबाभुळगाव येथे विकास यात्रेत सहभागी होऊन ग्रामस्थांसी संवाद साधून विविध योजनांची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र हातात घेतल्यापासून विकास आणि धोरणात्मक निर्णयातून देशाचा कायापालट केला. जागतिक पातळीवर देशाला गौरव प्राप्त करून दिला तर नागरिकांना त्यांचा स्वाभिमान आणि विकासाची गंगोत्री निर्माण केली. विकास यात्रा म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या कर्तुत्वाची यात्रा. प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून ही विकास यात्रा जिल्हाभरात यशस्वी करणार असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य, मा. सर्जेराव तांदळे, सरचिटणीस प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जाहगीर, चंद्रकांत फड, शांतीनाथ डोरले, अशोक लोढा, शरद झोडगे, भारत काळे, राहुल जोगदंड, हरीश खाडे, ज्ञानेश्वर आंधळे, अप्पासाहेब झोडगे, समवेत प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी सह भाजपा पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.