Site icon लोकाशा-बंब न्यूज

साखर झोपेतच वाळू माफियांना एसपींच्या पथकाने दिला दणका, गोदावरी पात्रात धाड, 1 कोटी 60 लाखाचा मुद्देमाल जप्त, वाळू माफियांचे धाबे दणाणले

बीड, आज रोजी पहाटे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक पथक प्रमुख API मुंडे व त्यांच्या पथकाणे चकलंबा पोलीस ठाणे हद्दीतील गुंतेगाव शिवारातील गोदावरी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करत असलेल्या (4 टाटा हायवा 6 टायर)आणी एक भारतबेन्ज (10 टायर हायवा) एक वाळूने भरलेला टाटा असे एकूण 5 वाहणावर धाड टाकून कार्यवाही करुन 120 ब्रास वाळू असा एकूण 1 कोटी 60 लाखाचा मुद्देलमाल जप्त करुन पुढील कार्यवाहीसाठी वाहनासह गेवराई महसूलला पाठवण्यात आले
सदर कामगिरी मध्ये पथक प्रमुख API गणेश मुंडे सह पो. ह. विष्णू व्हायबसे म. पो. ह.स्वाती मुंडे नियंत्रण कक्षातील शकेलन शेख आणी संतोष गिराम यांनी कार्यवाही केली. ऐन साखर झोपेतच केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Exit mobile version