Site icon लोकाशा-बंब न्यूज

पोलिस अधीक्षकांच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, गोदावरी पात्रातील धाडीत पाऊण कोटींचा वाळू साठा जप्त

बीड-पोलीस अधिक्षक पथक प्रमुख असलेल्या गणेश मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेवराई तालुक्यातील म्हाळसा पिंपळगाव येथील गोदावरी पात्रता छापा मारून जवळपास पाऊण कोटींचा वाळूसाठा जप्त केला. सदर वाळू महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात येतं आहे.

गणेश मुंडे यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी वाळू माफियाविरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली होती. यावेळी अनेक ठिकाणी छापेमारी करून कोट्यावधीचा साठा जप्त केला होता.यानंतर गणेश मुंडे यांच्यावर माफियानी भ्याड हल्ला केला होता. त्यानंतर काही काळ वाळूमाफियाविरोधातील मोहीम थंड पडली होती. मात्र आज पुन्हा एकदा म्हाळसा पिंपळगाव येथील गोदावरी पात्रता छापा मारून 2400 ब्रास वाळू ज्याची साधारण किंमत जवळपास पाऊण कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. दरम्यान ही कारवाई गणेश मुंडे,श्री.वायबसे, स्वाती मुंडे यांच्यासह राखीव दलाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Exit mobile version