Site icon लोकाशा-बंब न्यूज

कोणतीही निवडणूक लढवण्याचा इरादा नाही – अर्चना कुटे, द कुटे ग्रुपच्या अर्चना कुटेंनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंची घेतली भेट, पंकजाताईंसह जिल्हाध्यक्षांची चर्चा करूनच बावनकुळेंनी कुटेंचा भाजपात घेतला प्रवेश


बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : उद्योग क्षेत्रात बीड जिल्ह्याचा लौकीक निर्माण करणारे द कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे आणि सौ. अर्चना कुटे यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर पक्ष कार्यालयात प्रवेश केला.

शनिवारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या राशी निवासस्थानी द कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. अर्चना कुटे, आर्यन कुटे, यांनी भेट घेतली. यावेळी राजेंद्र मस्के व जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. जयश्री राजेंद्र मस्के यांनी अर्चना कुटे यांचे स्वागत करून भाजपा प्रवेशाला शुभेच्छा दिल्या. यावेळी कुटे ग्रुपचे डायरेक्टर आशिष पाटोदेकर उपस्थित होते. बीड सारख्या मागास जिल्ह्यात उभा केलेला उद्योग समूह यशस्वी व विस्तारित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे उद्योग समूहाला यथोचित आधार मिळेल. व संघटनेच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याची संधी लाभेल. आपला राजकारणात रस नसून, कोणतीही निवडणूक लढवण्याचा इरादा नाही, असे मत सौ. अर्चना कुटे यांनी राजेंद्र मस्के यांच्याशी चर्चा करताना व्यक्त केले. प्रवेशापूर्वी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याशी चर्चा करून, काल पक्ष प्रवेश झाला. कुटे दाम्पत्याचा प्रवेश भाजपासाठी महत्वपूर्ण आहे. जिल्ह्यात तिरुमला उद्योग समूहामुळे कुटे दाम्पत्याचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असून, हा जनसंपर्क भाजपा पक्ष विस्तारासाठी कामी येईल. त्यांचे समाज कार्यामुळे पक्षाचा जनाधार वाढेल. अशी प्रतिक्रिया देत राजेंद्र मस्के यांनी पक्ष प्रवेशाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शांतीनाथ डोरले, राकेश बिराजदार आदि उपस्थित होते.
Exit mobile version