बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : अंबाजोगाई येथे कार्यरत असलेल्या पोलिस अंमलदारास आपल्या पत्नीच्या सरपंच पदाचा प्रचार चांगलाच भोवला आहे. त्या अंमलदारास पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे.
पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथे नेमणुकीस असलेले पो.हे.कॉ. केशव मनोहर खाडे यांनी आपल्या आजारपणाचे कारण दाखवून सिकमध्ये राहून सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक सन 2023 मधील मौजे कांदेवाडी ग्रामपंचायत येथे सरपंच पदाकरिता उमेदवार असलेल्या आपल्या पत्नीचा सरपंच पदाच्या प्रचारामध्ये गुंतलेले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पोलीस स्टेशन अंबाजोगाई ग्रामीण येथील पो.हे.कॉ. केशव मनोहर खाडे यांना ताबडतोब निलंबीत करून कारवाई केली आहे.
पत्नीच्या सरपंच पदाचा प्रचार भोवला, पोलिस अंमलदारास एसपींनी केले तडकाफडकी निलंबित
