Site icon लोकाशा-बंब न्यूज

हालचाली वाढल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनावर दाखल, तर फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आलाय. राज्यातील मराठे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. या घडामोडींनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणाबाबत चर्चा झालीय. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची सूचना करु शकतात. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय किंवा विचार विनिमय करण्याचा निर्णय होऊ शकतो. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

Exit mobile version