बीड, दि. 23 (लोकाशा न्यूज) : पोलीस अधिक्षक पथक प्रमुख, सपोनि गणेश मुंडे व त्यांच्या सहकारी कर्मचार्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड मारत पाच हॉटेलवरून अवैध दारूसाठा जप्त केला आहे. सणा उत्सवाच्या तोंडावर पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी-विदेशी दारूची सर्रास अवैध विक्री सुरु होती. याबाबतची माहिती पोलीस अधिक्षक पथक प्रमुख गणेश मुंडे यांना मिळाल्यानंतर हॉटेल आर्या, हॉटेल जाणता राजा, हॉटेल मेम्बर, हॉटेल सुखसगर, हॉटेल 7/12 वर छापा मारून हजारोंचा साठा जप्त करण्यात आला.यावेळी पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पथक प्रमुख गणेश मुंडे, विष्णू वायबसे, स्वाती मुंढे यांच्या वतीने करण्यात आली.
दसर्याच्या पुर्वसंध्येला अवैधधंद्यावाल्यांना एसपींच्या पथकाचा दणका, पिंपळनेर हद्दीत पाच हॉटेलवर धाडी
