Site icon लोकाशा-बंब न्यूज

खाकीतील दुर्गांचा वाळू माफियांना दणका, अवैधपणे वाळू वाहतूक करणारे तीन हायवांसह 50 लाखांचा मुद्देमाल पकडला, पोलिस अधीक्षकांच्या विशेष महिला पथकाची मोठी कारवाई


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : खाकीतील दुर्गांनी वाळू माफियांना मोठा दणका देण्याचे काम केले आहे. अवैधपणे वाळू वाहतूक करणार्‍या तीन हायवांसह तब्बल पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी पोलिस अधीक्षकांच्या विशेष महिला पथकाने केली आहे. याबाबत बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पथकाने केलेल्या या मोठ्या कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर  यांनी नवरात्री उत्सवाचे निमित्ताने सपोनि प्रभा दासराव पुंडगे यांचे अधिनस्त एक महिला पोलीस पथक स्थापन केले असुन सदर पथकाचे प्रमुख व त्यांचे समवेत मपोशि/ 63 ए. एम. वंजारे, मपोशि/506 ए एस. शिंदे, व चालक पोशि/ 1923 डी. व्ही. राऊत यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने अवैध धंद्यावर केसेस करण्याकामी रात्रीची पेट्रोलिंग करीत असतांना कामखेडा परिसरात अवैध वाळु वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्याने धुळे सोलापुर रोडवर कामखेडा फाटा येथे पाहणी केली, यावेळी तीन भारतबझ हायवा वाळूने भरलेले जातांना दिसल्याने त्यांची चौकशी करुन हायवाच्या चालकांना वाळूबाबत विचारणा केली असता हायवामधील वाळुबाबत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे हायवा चालकांनी  सांगीतल्याने अवैध वाळु वाहतुक करणार्‍या हायवावर कारवाई करण्यात आली आहे.  यामध्ये चालक नाव, सलमान सलीम मिर्झा, वय 25 वर्ष, रा. तेलगाव नाका, ता. जि. बीड, चालकाचे नाव. युवराज ज्ञानोबा वडमारे, वय-38 वर्षे, रा. बेलापुर, ता. जि. बीड, चालक नाव, नवनाथोबा कोकरे, वय-38 वर्षे, रा. बागपिंपळगाव, ता. जि. बीड, भारत बेंझ हायवा क्र. चक 23. Aत 8855 त्यामध्ये बाळु अंदाजे 06 ब्रास वाळुसह अंदाजे मुल्य 1,530,000 रु. 2) भारत बेंझ हायवा क्र. चक 12. टथ 7597 त्यामध्ये वाळू अंदाजे 06 ब्रास वाळूसह अंदाजे मुल्य 1,530,000रु. 3) भारत बेंझ हायवा क्र. चक 23. Aत 1743 त्यामध्ये वाळु अंदाजे 06 ब्रास वाळुसह अंदाजे मुल्य 1,530,000रु. असा एकुण 4590,000 रूपये मुल्यचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Exit mobile version