Site icon लोकाशा-बंब न्यूज

निवडणुका डोळ्यासमोर ठेवत राजकारण करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत, देशात अपंगांना प्रतिष्ठा मिळवुन देण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले-खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे प्रतिपादन

अंबाजोगाई(प्रतिनिधी)-मतदान तथा राजकिय स्वार्थ डोळ्यासमोर ठेवुन काम करण्याचे संस्कार आमच्या घराण्यावर नाहीत. लोकहिताच्या कामासाठी सतत पुढे यावं ही शिकवण स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची असुन त्याच संस्काराने जाताना सामान्य माणुस हाच आमचा मानवता धर्म. शारीरिक अपंग आणि त्यांचे दु:ख समाजात आवाहन असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगाचा उच्चार दिव्यांग करणं म्हणजेच त्या घटकातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढवणं असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंंडे यांनी केले.
केंद्र सरकार आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दिव्यांग रूग्णांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. साधना मंगल कार्यालयात पार पडलेल्या देखण्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ.सौ.नमिताताई मुंदडा ह्या होत्या. सुरूवातीला मान्यवरांचा सत्कार संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकद्वारे भाजपा जिल्हा आरोग्य आघाडीचे प्रमुख डॉ.नेहरकरांनी कार्यक्रमाचा आढावा घेवुन संपुर्ण जिल्ह्यात 3500 दिव्यांग अपंगांना साहित्य वाटपाचा लाभ दिल्याचे सांगितले. याप्रसंगी बोलताना आ.नमिताताई मुंदडा म्हणाल्या की, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पुढाकारामुळे दिव्यांग सहाय्यतेचा यज्ञ संपुर्ण जिल्ह्यात पार पडत असुन समाजाच्या उपेक्षित, दुर्लक्षित अशा लोकांच्या आरोग्य रक्षणासाठी खासदार ताईंनी घेतलेला पुढाकार कमालीचा वाटतो. डॉक्टर खासदार असल्याचा जिल्हावासियांना फायदा कसा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिव्यांग शिबीर असं त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात बोलताना खा.प्रितमताई मुंडेंनी सुरूवातीलाच नंदकिशोर मुंदडा यांच्या पुढाकाराने दिव्यांगाचा कार्यक्रम एखादा सोहळ्यात रूपांतर कसं असतं याचे उत्तम उदाहरण दाखवलं असुन केजमध्ये चांगले कार्यक्रम घेण्यासाठी मजबुत फळी असल्याचा उल्लेख त्यांनी केला. एखादा कार्यक्रम देखणा कसा करावा आणि दिव्यांग व्यक्तीदेखील आपल्याच पैकी आहेत हे समजुन आंतरमनाने सोहळा करणं यासाठी सेवाभाव महत्वाचा जो नमिताताई मुंदडा यांच्या रूपाने केज मतदारसंघात नेहमीच अनुभवाला येत असल्याचे सांगुन त्यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. पुढे बोलताना त्या म्हणतात, या जिल्ह्यात आम्ही चांगल्या कामात राजकारण कधी करत नाहीत. त्यातही मतदान निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन आमचा सेवाभाव नसतो. समाजातील वंचित, उपेक्षित दिव्यांगासारख्या लोकांना आपल्यसोबत प्रवाहात आणणे आणि सामान्य लोकांची सेवा करणे हेच संस्कार आमच्यावर स्व.मुंडे साहेबांनी दिले असुन तो सक्षमपणे वारसा आम्ही चालवतो. दुसऱ्याचं दु:ख ते आपलं दु:ख हा भाव आमच्या मनी आहे हे सांगताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अपंगांना दिव्यांगाची प्रतिष्ठा देवुन साहित्याचा केलेला पुरवठा खऱ्या अर्थाने आयुष्याला प्रेरणा आणि आनंद देणारा नक्कीच आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब असो किंवा स्व.विमलताई मुंदडा असो आम्हा लेकीवर संस्काराचा वारसा आहे आणि तो आम्ही पुढे चालवतो. नवरात्री उत्सवात महिला म्हणुन हे कार्य आम्हाला घडलं हे सांगताना त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. आमच्या जीवात जीव असेपर्यंत केवळ समाज कल्याणासाठी दुरदृष्टीने आम्ही काम करत राहु हा संकल्प त्यांनी बोलुन दाखवला. व्यासपीठावर राम कुलकर्णी, अच्युतबापु गंगणे, भगवान केदार, प्रताप आपेट, हिंदुलालजी काकडे, सुनिल आबा गलांडे तर समोर उपस्थितांमध्ये जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, गणेश कराड, मधुकरराव काचगुंडे, ऍड.संतोष लोमटे, महादेव फड, प्राचार्य डॉ.बिभीषण फड, नगरसेवक संजय गंभीरे, शिवाजीराव गित्ते, ऍड.शरदराव इंगळे, अनंतराव आडसुळ, महादेव मस्के, महेश आंबाड, अमोल पवार, शिरीष मुकडे, प्रशांत आदनाक, सुनिल आडसुळ, गणेश रूद्राक्ष, माऊली वैद्य, अक्षय भुमकर, योगेश कडबाने, अतुल कसबे, सत्यप्रेम इंगळे, मंगेश गुजर, व्यंकट किर्दंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन प्रकाश बोेरगावकर यांनी केले तर आभार अच्युतबापु गंगणे यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर दिव्यांग व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version